मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 फेब्रुवारी 2019 (08:58 IST)

मुंबईकर तुमचा विमानप्रवास महागणार आहे, हे आहे कारण

aircrafts
आता मुंबई येथून विमान प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या प्रवास महागणार आहे. यापुढे मुंबई येथून प्रवास करतांना प्रवासासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. ही  मुख्य म्हणजे थोडी नसून तिकीट दरात तब्बल २० ते ५० टक्क्यांनी वाढणार आहे. हो मात्र याचे, कारणही तसंच असणार आहे. कारण की  छत्रपती शिवाजी महाराज अंतराष्टीय विमानतळावरील मुख्य धावपट्टीच्या दुरूस्तीचे काम सुरु झाले आहे. दुरूस्तीच्या कामासाठी मुख्य धावपट्टी काही दिवसांसाठी दररोज ६ तास बंद असणार आहे. त्यामुळे विमान सेवा वापरणाऱ्यांना मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत हा अतिरिक्त तिकिटाचा त्रास सहन करावा लागणार असून, यामुळे अनेक विमाणांची उड्डाणे देखील रद्द केली आहेत. त्यामुळे विमान प्रवास करताना वेळापत्रकात होणारे बदल लक्षात घेऊनच प्रवास करावा असे, अवाहन विमान कंपन्यांनी केले आहे. मुंबई विमानतळावरून दर ६५ सेकंदाला विमानाचे हवेत टेक ऑफ आणि जमिनीवर लँडीग करते. त्यामुळे धावपट्टीवर सतत ताण येतो. दुरूस्तीसाठी सकाळी ११ ते ५ या काळात ही धावपट्टी बंद ठेवली जाणार आहे. या काळात पर्यायी व्यवस्था म्हणून दुसऱ्या धावपट्ट्यांवर टेक ऑफ आणि लँडीग  होईल, त्यामुळे मुंबई-अहमदाबाद तसेच मुंबई-दिल्लीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सर्वाधिक फटका बसणार आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या प्रवाशांवर अतिरिक्त तिकीट दरांचा बोझा सहन करावा लागणार आहे.