शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 सप्टेंबर 2023 (17:07 IST)

Zika virus : झिका व्हायरसचा दुसरा रुग्ण मुंबईत आढळला

Zika virus : झिका व्हायरसचा संक्रमण पुन्हा आढळत आहे. चेंबूर मध्ये पहिला झिका रुग्ण आढळला होता आता पुन्हा या घातक व्हायरसचा रुग्ण मुंबईत आढळला आहे. या वेळी एका 15 वर्षाच्या मुलीला या व्हायरसची लागण लागली आहे. तिला ताप आणि डोकेदुखीचा त्रास होत होता. तिच्यावर खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार दिल्या वर तिला पुढील उपचारासाठी सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे.  
 
झिका व्हायरसची लागण कुर्ल्यातील एका 15 वर्षाच्या मुलीला लागली आहे. सदर मुलीला ताप आणि डोकं दुखीचा त्रास होत होता गेल्या काही दिवसांपासून ती आजारी होती. 
 
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिची आणि कुटुंबीयांनी तसेच परिसरातील लोकांची तपासणी केली असता मुलीला झिका व्हायरसची लागण लागली असल्याचे समजले. झिका व्हायरसच्या दुसरा रुग्ण मुंबईत आढळल्याने खळबळ उडाली आहे. 
 
Edited by - Priya Dixit