शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अमृता फडणवीस यांच्या समोरच भोंदूगिरी

पुणे- राज्यात एकीकडे बुआबाजी प्रतिबंधक कायदा अमलात आला असताना पुण्यातील सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटच्या कार्यक्रमात ब्रम्हऋषी गुरुवानंद स्वामीने चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीसमोरच धूळफेक केली.
 
पुण्यातील एक कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता यांना एका राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. या सोहळ्यात उपस्थित ब्रम्हऋषी गुरुवानंद स्वामीला अमृता यांनी नमस्कार केला. त्यानंतर स्वामींनी हवेत हात फिरवत एक सोनसाखळी काढली आणि ती अमृता फडणवीस यांना दिली. हे स्वामी तिरूपतीचे आहेत.