शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , सोमवार, 24 नोव्हेंबर 2014 (11:02 IST)

अरविंद भोसलेंनी नाकारल्या सोन्याच्या चपला

निष्ठावंत शिवसैनिक अरविंद भोसले तब्बल नऊ  वर्षे अनवानी पायांनी फिरले. शिवसेना पक्षप्रमुख  यांच्याहस्ते भोसले यांनी सोन्याच्या चपला भेट देण्यात  आल्या. मात्र भोसले यांनी त्या नाकारल्या.  शिवसेनेसाठी प्राण अर्पण करणार्‍या गोवेक कुटुंबियांना  सोन्याच्या चपला अर्पण करण्यात आल्या.
 
मनाचा मोठेपणा आणि शिवसैनिकांबद्दलच्या प्रेमाचा अरविंद  भोसले यांनी पुन्हा एकदा प्रत्यय आणून दिला आहे. साडेपाच तोळ्याच्या आणि सव्वा लाख रुपये किंमत  असलेल्या सोन्याच्या चपला भोसले यांनी शिवसैनिक रमेश गोवेकर यांच्या कुटुंबियाना अर्पण केल्या. शिवसेनेच्या  प्रचार करताना 2005 मध्ये सिंधुदुर्गमधले रमेश गोवेकर यांचा मृत्यु झाला होता. 
 
रविवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोंदा गावातील  बाजारपेठेत झालेल्या एका कार्यक्रमात शिवसेनेचे नवनियुक्त  प्रवक्ते अरविंद भोसले यांच्या हस्ते सोन्याच्या चपला  गोवेकर कुटुंबियांना देण्‍यात आल्या. 
 
दरम्यान, नारायण राणे शिवसेनेत असताना त्यांचे पीए  असलेले रमेश गोवेकरांनी त्यांच्यासोबत शिवसेना सोडण्यास  स्पष्ठ नकार दिला होता. रमेश गोवेकर 2005 च्या  निवडणूक प्रचारात बेपत्ता झाले होते. नोव्हेंबर 2005 मध्ये मालवण  किल्ल्याजवळ गोवेकरांचा मृतदेह आढळला  होता. असे गोवेकर कुटुंबियांनी म्हटले आहे. या प्रकरणी  कोर्टात सुनावाणी प्रलंबित आहे.