शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 25 जुलै 2014 (10:46 IST)

आयपीएस अधिकार्‍याचा मुंबईत मॉडेलवर बलात्कार

मायानगरीत एक मॉडेलवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे पीडित मॉडेलने एक आयपीएस दर्जाच्या अधिकार्‍यावर बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिस उपमहानिरीक्षक सुनील परसकर यांच्याविरोधात तिने तक्रार दाखल केली आहे. परसकर यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या गुरुवारी रात्री परसकर यांनी तिला एका हॉटेलमध्ये नेले होते.तिथे परसकर यांनी तिचावर बलात्कार केला. यापूर्वी त्यांनी अनेकदा आपल्यावर बलात्कार केल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. परसकर यापूर्वी अतिरिक्त पोलिस आयुक्त  या पदावर कार्यरत होते.