शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , मंगळवार, 3 जून 2014 (14:21 IST)

'उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार , हे निश्चित आहे'

राज्यात जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यंदा स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार, हे निश्‍चित आहे, असे पक्षप्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले. दुसरीकडे ज्या पक्षाचे आमदार जास्त त्याच पक्षाचा मुख्यमंत्री, अशी भाजपची भूमिका असल्याले भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे युतीमध्ये अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

भाजपमध्ये मुख्यमंत्री कोण, या विषयावर वाद होणार नाही. महायुतीचाच मुख्यमंत्री होईल आणि ज्या पक्षाच्या जास्त जागा त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. गेली अनेक वर्षे युती एकत्रितपणे निवडणुकांना सामोरी जात असताना मुख्यमंत्रिपद हा विषय ज्याचे जास्त आमदार त्यालाच ही संधी, या निकषाने सोडवला जातो आहे. त्यात बदल होण्याचे कारण नाही, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.