शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: रत्नागिरी , गुरूवार, 31 जुलै 2014 (12:13 IST)

कोकणसह मध्य महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार

गेल्या तीन दिवसांपासून कोकणात पावसाच जोर वाढला आहे. खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला महापूर आल्याचे पुराचे पाणी खेडशहरात शिरले आहे. तर नाशिकमध्ये दोन दिवसांपासून पावसाचा मुक्काम आहे. येथील धरणे तुडूंब भरली आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरु आहे. संगमेश्वर, साखरपा, खेड, दापोली, चिपळूण आदी परिसरात चांगला पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसाचा फटका खेडला बसलाय. खेड बाजारपेठेत पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांची तारंबळ उडाली आहे. रायगडमध्ये पावसाचा जोर आहे. येथील नद्यांची पातळीत वाढ झाली आहे. पेणमध्ये पुराचे पाणी घुसले असून पेण एसटी स्थानकात पाणी साचले आहे. 
 
नाशिकसह जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे पेरण्यांना वेग आला आहे. दुसरीकडे नाशिक-मुंबई दरम्यान कसारा घाटात दरड कोसळ्याने मनमाड ते मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. नाशिक, देवळाली आणि इगतपुरी स्टेशनवर रेल्वे थांबविण्यात आल्या तर काही गाड्या मनमाडमार्गे वळविण्यात आल्या आहेत