शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: कणकवली , गुरूवार, 11 फेब्रुवारी 2016 (10:47 IST)

कोकणात अपघात; चार ठार

खासगी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत चौघे जागीच ठार झाले. मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री झालेल्या या अपघातात  तीसहून अधिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

 महामार्गावरील बेळणे या गावात येथे गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. गुजरातमधील पर्यटक खासगी बसने  गोव्याहून परतत असताना रत्नागिरीतील उडपे येथे जात असलेल्या ट्रकची  समोरासमोर धडक झाली.

त्याचवेळी पाठीमागून येत असलेल्या कंटेनरची बसला धडक बसली. यामुळे या अपघातात बसमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला.