शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: कोल्हापूर , शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (15:45 IST)

कोल्हापूरात टोलप्रश्न पुन्हा ‘पेटला’

टोलप्रश्नावर कोल्हापूरातील टोलविरोधी कृती समितीच्या महिला पुन्हा आक्रमक झाल्या. टोल वसुल करणाºया कर्मचाºयांनी एका चालकाला मारहाण केल्याने या महिलांनी कळंबा येथील टोल नाक्यावर धावा बोलत नाक्यावरील कर्मचाºयांना चोपलेच शिवाय तेथील बॅरिकेट्सही फेकून दिले.
 
विधानसभा निवडणूकीपासून कोल्हापूरातील टोलचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. येथील नागरिकांचा टोलचा विरोध आहे. त्यामुळे सातत्याने आंदोलन केले जात आहे. बुधवारी टोल देण्यास नकार देणाºया एका ट्रकचालकाला कळंबा येथील टोल वसुल करणार्‍या    कर्मचार्यांनी मारहाण केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या टोलविरोधी कृती समितीच्या महिलांनी गुरुवारी नाक्यावर जाऊन मारहाण करणार्‍या कर्मचार्‍यांना चोप दिला. अचानक झालेल्या या घटनेमुळे येथील टोलवसुली काही काळापुरती थांबली होती. दरम्यान, चालकाला मारहाण करणार्‍या कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने केली आहे.