शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 नोव्हेंबर 2014 (12:51 IST)

कोल्हापूरातील ‘टोलधाड’ थांबणार?

कोल्हापूरात टोलचा प्रश्न पुन्हा पेटल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यात लक्ष घातले असून टोलमुक्तीसाठी प्रयत्न सुरु असून सरकार आपला शब्द पाळणार असल्याची स्पष्टोप्ती दिली. याबाबत पाटील यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीची आज (शनिवारी) कोल्हापूरात बैठक होत आहे.
 
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून कोल्हापूरात टोलचा प्रश्न चर्चेत राहिला आहे. यावरुन याठिकाणी अनेक आंदोलने झाली आहेत. चालकाला मारहाण केल्यानंतर टोलविरोधी कृती समितीच्या महिला सदस्यांनी मारहाण करणाºया कर्मचाºयांना चोप दिला होता. यानंतर हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
 
भाजपा सरकारने निवडणुकीत दिलेला शब्द पाळून कोल्हापूरात टोलमुक्ती करावी, अशी मागणी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने केली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, टोलचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशिल असून याबाबत होणाºया बैठकीतही यावर चर्चा केली जाईल.