शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: डोंबिवली , बुधवार, 29 जुलै 2015 (11:32 IST)

ठाण्याच्या ठाकुर्लीतील इमारत कोसळी, मृतांचा आकडा ९ वर पोचला

मुंबईज्या नजीक ठाण्याच्या ठाकुर्ली भागात तीन मजली इमारत कोसऴल्याचे वृत्त आहे. मातृकृपा असे या इमारतीचे नाव असून इमारतीच्या ढिगा-याखाली २० कुटुंबं अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी फायर ब्रिगेडचे जवान दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. मृतांचा आकडा वाढला, 9 जण झाले ठार. चोळे गावातील ही इमारत महानगरपालिकेने यापूर्वीच धोकादायक म्हणून जाहीर केली होती. तसेच दोनच दिवसांपूर्वी या इमारतीच्या जिन्याचा काही भाग कोसळला होता आणि त्यानंतर ही घटना घडली.