शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: तासगाव , सोमवार, 3 ऑगस्ट 2015 (11:33 IST)

तासगावात राष्ट्रवादीचा ‘बाहुबली’

भाजपा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत झालेल्या हाणामारीनंतर संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने १९ पैकी १८ जागांवर एकतर्फी विजय मिळविला.

शनिवारी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत झालेल्या मारामारीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतमोजणी केंद्रातही तणावाचे वातावरण होते. समितीच्या १९ जागांपैकी राष्ट्रवादीची एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली होती. उर्वरित १८पैकी १७ जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजय झाला.