शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , गुरूवार, 21 ऑगस्ट 2014 (11:11 IST)

नागपूरच्या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांची दांडी

उरण आणि सोलापूर येथील जाहीर सभांमध्ये आपल्याला जो अनुभव आला तो लक्षात घेता आपण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूर मेट्रोच्या उद्घाटन समारंभास उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. कुलाबा ते सिप्झ अंधेरी या मुंबई मेट्रो-3 चे उद्घाटन येत्या एक-दोन दिवसांत करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
 
उरण तसेच सोलापूर येथे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत दोन जाहीर कार्यक्रम झाले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील या कार्यक्रमांस उपस्थित होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. हरयाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुडा यांच्या कार्यक्रमातही मोदींसमर्थकांच्या बाजूने घोषणाबाजीची पुनरावृत्ती झाली. नागपूर मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन आहे. केंद्र व राज्याच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. मुख्यकार्यकर्त्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण आहे. मात्र, दोन कार्यक्रमांत जे प्रकार घडले ते पाहता नागपूरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास आपण उपस्थित राहणार नाही. मात्र,  राज्यशिष्टाचारानुसार राज्याचा एक प्रतिनिधी या कार्यक्रमास उपस्थित राहील असे त्यांनी स्पष्ट केले. खासदार म्हणून आपण एका मतदारसंघातून निवडून येत असतो. मात्र, केंद्रीयमंत्री झाल्यानंतर आपण संपूर्ण देशाचे हित बघायचे असते, केवळ आपल्या मतदारसंघापुरते पहायचे नसते, असा टोला त्यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना लगावला. आरटीओची व्यवस्था बंद करून नवीन व्यवस्था आणणार असल्याचे गडकरी यांनी जाहीर केले आहे. पण कोणती व्यवस्था आणणार हे आधी स्पष्ट करायला हवे. केवळ पाश्चात्यांचे अंधानुकरण करून चालणार नाही. असाही टोला त्यांनी लगावला.