शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By WD|
Last Modified: मुंबई , मंगळवार, 4 मार्च 2014 (11:43 IST)

नितीन गडकरींचे 'राज'कारण; मुंबईत गुप्त बैठकीने खळबळ

भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि महारा्ष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत एका पंचताराकींत हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. 
 
सुरुवातीला ही केवळ चर्चा असल्याचे भासवण्यात आले. मात्र मुंबई भाजपचे शाखाअध्यक्ष आशीष शेलार यांनी 'ट्‍विटर'च्या माध्यमातून दिली. शेलार हे स्वत: या बैठकीला उपस्थित होते. गडकरी आणि ठाकरे भेट झाल्यास शेलार यांनी नकार दिला.मात्र स्वत: गडकरी यांनीच भेट झाल्याचे एका मराठी वृत्तवाहिनीला सांगितले.
 
महायुतीत 'मनसे' सहभागी झाला तर फायदाच होईल, असे गडकरींना जाहीरपणे सां‍गितले. राज ठाकरे महायुतीत आल्यास त्यांचे स्वागत असल्याचे रिपइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेने मात्र याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 
 
दरम्यान, गेल्या आठवड्यात राज ठाकरे आणि नितीन गडकरी नाशिक येथील एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. दोघांनी एकमेकांवर स्तुतीसुमनेही उधळली होती.