शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पंकज भुजबळविरुध्द अटक वॉरंट जारी

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, समीर भुजबळ हे दोघे तुरुंगात असताना आता पंकज भुजबळ यांच्याविरोधात कोर्टाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. मनी लाँडरिंग प्रकरणी विशेष पीएमएलए- कोर्टाने छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे.

पंकज यांच्यासह आणखी 34 जणांविरोधातही हे वॉरंट बजावण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेल्या छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या अडचणी कायम आहेत. दोघांच्याही न्यायालयीन कोठडीत 11 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.