शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , सोमवार, 15 फेब्रुवारी 2016 (10:59 IST)

पुण्यात व्हॅलेंटाईनदिवशी मैत्रिणीवर बलात्कार

अ‍ॅमोनरा पार्कमध्ये व्हॅलेंटाईन डेनिमित्त मैत्रिणीने बोलाविलेल्या पार्टीनंतर मित्रानेच तिच्यावर बलात्कार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
 
याप्रकरणी फिरोज महम्मद शेख या तरुणाविरुध्द च्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे. कलकत्ता येथील मुळची असणार्‍या सबंधित तरुणीने व्हॅलेंटॉइन डे निमित्त पार्टीचे आयोजन केले होते. यासाठी तिने दोन मित्रांना घरी बोलवले होते.
 
पहाटे २ वाजता पार्टी संपल्यानंतर हॉलमध्ये झोपलेल्या फिरोजने बेडरूममध्ये जाऊन तिच्यावर बलात्कार केला.