शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 31 ऑगस्ट 2015 (15:43 IST)

प्रबोधकची ठाणे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

दिनांक ३० ऑगस्ट रोजी प्रबोधक या सामाजिक संस्थेतर्फ़े ठाण्याच्या बांदोडकर महाविद्यालय येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बांदोडकर महाविद्यालय आणि जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 
 
प्रबोधक हा तरुणांसाठी सामाजिक उपक्रम आहे. तरुणांमध्ये योग्य विचार आणि मुल्ये रुजावीत, शिक्षण, करिअर, नोकरी व्यवसाय याबाबतीत तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि विशेषतः प्रशासकीय सेवा आणि नोकरीच्या माध्यमातून तरुण यंत्रणेमध्ये यावेत, यासाठी प्रबोधक विविध उपक्रम राबवीत आहे. 
 
याच अनुषंगाने या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी बांदोडकर महाविद्यालय आणि जोशी-बेडेकर महाविद्यालयाचे प्रचंड सहकार्य लाभले. या स्पर्धेची अंतिम फेरी २४ सप्टेंबर रोजी होणार आहे.