शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 24 ऑगस्ट 2016 (11:33 IST)

बारावी फेरपरीक्षेचा आज निकाल

बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.

गुणपडताळणीसाठी विहित शुल्कासह २५ आॅगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करता येईल. शिवाय ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची प्रत हवी आहे, त्यांना निकालानंतर मंडळाकडे असलेल्या विहित नमुन्यात २५ आॅगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करता येईल.नऊ विभागीय मंडळांतून ९ ते २९ जुलैदरम्यान बारावीची फेरपरीक्षा घेण्यात आली होती. त्यास१ लाख २५ हजारांच्या दरम्यान विद्यार्थी बसले होते.