शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , मंगळवार, 26 मे 2015 (13:09 IST)

बारावीचा परीक्षेचा निकाल बुधवारी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या बुधवारी, 27 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सोमवारी ही माहिती दिली. दुपारी एक वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. पुढील आठवडय़ात विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची प्रत मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून बारावीचा निकाल कधी लागणार, याकडे शैक्षणिक वतरुळाचे लक्ष लागले होते.