1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 ऑगस्ट 2014 (17:24 IST)

बाळासाहेब थोरातांवरील शाईफेक ही निंदनीय घटना- मुख्यमंत्री

संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शाई फेकणारा इसम भाऊसाहेब हासे हा शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळते आहे. पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे. या  आधी हसन मुश्रीफ, नंतर हर्षवर्धन पाटील आणि आता बाळासाहेब थोरातांवर शाईफेक करण्यात आली आहे.