शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By नई दुनिया|

बाळासाहेबांचा नातू कविता लिहितो....

PRPR
ठाकरे घराणे आणि सृजनशीलता हे नाते काही नवे नाही. या परंपरेला या घराण्याचे पुढचे शिलेदार पुढे नेत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब स्वतः एक उत्तम व्यंगचित्रकार, मुलगा उद्धव उत्तम छायाचित्रकार आणि आता उद्धव यांचा चिरंजीव आदित्य एक उत्तम कवी आहे. नुकतेच त्याच्या एका अल्बमचे प्रकाशन अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झाले.

सतरा वर्षांच्या आदित्यमध्ये असलेला संवेदनशील कवी सगळ्यांना अचंबित करून गेला आहे. कारण त्याच्या वयाच्या मानाने त्याच्या कवितांमधील खोली खूपच आहे. त्याचा नुकता प्रदर्शित झालेला उम्मीद हा अल्बमही चर्चेचा विषय ठरला आहे. आदित्यने यातील सतरा गाणी लिहिली आहेत. मयुरेश पै यांनी त्याला संगीतबद्ध केले आहे.

उम्मीदमध्ये जीवनातील प्रत्येक पैलू मांडला आहे. अध्यात्म, प्रेम, विरह या साऱ्या भावना त्यात आहेत. या अल्बममधील गाणी सुरेश वाडकर, देवकी पंडित, शंकर महादेवन, कैलाश खेर, सुनिधी चौहान, कुणाल गांजावाला यांनी गायली आहेत. जगदिश माळी यांनी या व्हीडीओ अल्बमचे दिग्दर्शन केले आहे.

आजोबांचे प्रोत्साह
आदित्यच्या कवितांना खतपाणी घातले ते आजोबा बाळासाहेबांनी. आदित्य म्हणतो, मला जसे सुचे तशा मी कविता लिहित होतो. एकदा बाळासाहेबांनी त्या वाचल्या आणि त्यांना प्रकाशित करायला हवे असे सांगितले. त्यांच्या प्रोत्साहनानंतरच माय थॉट्स इन ब्लॅक अँड व्हाईट हा आदित्यचा कवितासंग्रह प्रकाशित झाला. या पुस्तकातील एक परींदा हा कविता सुरेश वाडकर व देवकी पंडीत यांनी गायली आहे.