शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , सोमवार, 22 डिसेंबर 2014 (11:31 IST)

मंत्रालय प्रवेशाची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार

राज्य सरकारचे मुंबईतील मुख्यालय असलेल्या मंत्रालयामध्ये शासकीय कामासाठी मंत्र्यांना भेटावयाला येणार्‍या राज्यातील लोकांसाठी मंत्रालयात प्रवेश देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार असल्याचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव राजेश अग्रवाल यांनी रविवारी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे.
 
नागपूर येथे सुरू असलेले महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळीअधिवेशन संपल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खाते आणि गृहमंत्रालय यांच्या प्रधान सचिवाबरोबर विचारविनिम करून मंत्रालयात प्रवेश देण्याची प्रक्रिया सुलभ आणि किमान त्रास व्हावा, अशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मंत्रालयात नागरिकांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुलभ करा आणि लोकांना प्रवेशासाठी विनाकारण त्रास होऊ नये, याची दक्षता घेण्याला मुख्यमंत्री देवेंद्र ङ्खडणवीस यांनी राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना सूचना दिल्या आहेत.
 
मंत्रालयात प्रवेश देण्याची नवी पध्दत 15 जानेवारी 2015 पासून अंमलात आणण्याचा सूचना फडणवीस यांनी दिल्याचे अग्रवाल यांनी प्रतिपादन केले आहे. मंत्रालयात शासकीय कामासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यामधून दररोज मोठय़ा संख्येने लोक मंत्रालयात येत असतात.