शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: औरंगाबाद , बुधवार, 5 ऑगस्ट 2015 (11:18 IST)

मराठवाड्यात अखेर कृत्रिम पाऊस पावला

कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरु होताच मराठवाड्यात जोरादार पावसास सुरुवात झाली आहे. दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर शेतांना पाणी मिळाले आहे.

मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम पावसाने हजेरी लावली. परभणी जिल्ह्यातही रिमझिम पाऊस झाला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने घेतलेल्या नोंदीनुसार ४.६ मि.मी. पाऊस झाला होता. नांदेड, जालना, हिंगोली, बीड आदी जिल्ह्यांत सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू होता.