शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Updated :मुंबई , शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (16:59 IST)

महाराष्ट होणार ‘एलबीटीमुक्त’

राज्य सरकारचे संकेत, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
महाराष्टातील व्यापार्‍यांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन महाराष्टातील भाजपा सरकारने व्यापार्‍यांची एलबीटीपासून मुक्ती करण्यासाठी पावले उचलली आहेत. स्थानिक संस्था कर (एलबीटी) आणि जकात रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० नोव्हेंबर रोजी महापालिका आयुक्त व संबंधित अधिकार्‍यांची बैठक  बोलावली आहे.
 
मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फॅम)च्या शिष्टमंडळाने जकात आणि स्थानिक संस्था कर रद्द करण्याबाबतचे निवेदन दिले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी एलबीटीपासून मुक्ती करण्याचे आश्वासन भारतीय जनता पार्टीने दिले होते. आता सत्तेत आल्यानंतर पक्षाने आपला शब्द पाळावा, अशी व्यापार्‍यांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रश्नी लक्ष घातले आहे.
 
मुख्यमंत्री म्हणाले की, जकात कर आणि एलबीटी हटवण्याची व्यापार्‍यांची मागणी आहे. राज्याचे आर्थिक नुकसान न होता याबाबत योग्य पयार्यांचा विचार करून लवकरात लवकर रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल.