शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By we|
Last Modified: मुंबई , बुधवार, 23 जुलै 2014 (11:00 IST)

माझ्या मुलाला उमेदवारी द्यावी; नारायण राणेंची डिमांड?

राज्याचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी राजीनामा देऊन पक्षाविरोधात दंड थोपटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राणेंचा राजीमाना अद्याप स्वीकारले नाही. दुसरीकडे, आगामी विधानसभा निवडणुकीत माझ्याऐवजी माझा मुलगा नितेशला कुडाळमधून उमेदवारी द्यावी, अशी नवी डिमांड राणे यांनी केल्याचे समजते. मी निवडणूक न लढविण्याचा विचार करीत असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. 
 
नारायण राणे यांनी राजीनाम्याचा फेरविचार करावा, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. मात्र, राणे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राणे यांच्याशी मंगळवारी सकाळी तब्बल दोन तास चर्चा केली. परंतु कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता राणे यांच्या राजीनाम्याचा चेंडू आता पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कोर्टात आहे. पुढील निर्णय सोनिया गांधी या घेणार असल्याचे कॉंग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. 
 
राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, काँग्रेसमध्ये माझी कोणत्याही प्रकारची घुसमट होत नाही. मात्र, विधानसभा निवडणूक न लढण्‍याचा विचार मी करतोय. मात्र, कुडाळ विधानसभा मतदार संघातून माझा मुलगा नितेश याला उमेदवारी द्यावी, अशी मनिषाही राणे यांनी यावेळी बोलून दाखवली. 
 
दरम्यान, नारायण राणे यांनी राज्यातील नेतृत्त्वा विरोधात बंड पुकारला आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांना बदलण्याचीही मागणी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. मात्र, चव्हाण यांना कुठलाही धोका नसल्याचे दिसताच राणे यांनी राजीनाम्याचे शस्त्र उपसले असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तसेच आगामी विधासभा निवडणुकीत कॉंग्रेसला फक्त 40 जागा मिळतील, असे भाकीतही राणे यांनी मांडले आहे. असे असतानाही कॉंग्रेसने अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.