शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 10 फेब्रुवारी 2016 (11:08 IST)

मी कोणताही गुन्हा केला नाही : भुजबळ

आम्ही कोणताही गुन्हा केला नाही त्यामुळे पळून जाण्याचा प्रश्नच येत नाही... मीसुद्धा कोणत्याही चौकशीस सामोरा जाण्यास तयार आहे, अशा शब्दात  राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी  आपली बाजू मांडली.
 
गैरव्यवहाराचा ठपका असल्याने अडचणीत आलेले भुजबळ म्हणाले, आम्ही निष्पाप आहोत, कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आपण तयार आहोत.
 
मी वॉशिंग्टनला रवाना होताच, मी ऐन वेळी निघून गेलो, पळून गेलो, अशा चर्चा झाल्या. मी परतणारच नाही, असेही सांगितले गेले. मला २५ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या मेंबर्स ऑफ कॉमर्सने तेथे येण्याचे निमंत्रण दिले होते. तेथे ३ दिवसांचे अधिवेशन होते. त्यासाठी १४० देशांचे प्रतिनिधी येणार होते आणि ४ फेब्रुवारी रोजी तेथे बराक ओबामा येणार असल्याचेही पत्र मला आले. खासदार, मंत्री, लोकप्रतिनिधी असा सगळ्यांचा त्यात सहभाग होता. मीही सहभागी झालो होतो, असे भुजबळ यांनी सांगितले.