शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , बुधवार, 27 ऑगस्ट 2014 (12:53 IST)

मुंबई-गोवा महामार्गावर बस दरीत कोसळली, एकाचा मृत्यू

कोकणात जाणार्‍या एसटी बसला आज (बुधवार) भीषण अपघात झाला. मुंबई- गोवा महामार्गावर हा अपघात झाला. वालोपेजवळ ही बस खोल दरीत कोसळली. या अपघातात. एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर वालोपेजवळ बोरिवली-साखरपा ही बस खोल दरीत कोसळली. यात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, जखमी प्रवाशांना नजीकच्या रुग्णावलयात दाखल करण्यात आले आहेत. बचावकार्य सुरु आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.