1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Updated :मुंबई , मंगळवार, 29 जुलै 2014 (17:43 IST)

मुंबईत मुसळधार; येत्या 24 तासांत आणखी जोर वाढणार

मुंबईसह उपनगरात गेल्या 12 तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे रस्ते तसेच रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच येत्या 24 तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 
 
मध्य रेल्वेसह उपनगरीय वाहतूक मंदावली आहे. गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. याचबरोबर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूकीला फटका बसला आहे. काही ठिकाणी जाम लागल्याचे वृत्त आहे. डहाणू रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे रुळावर झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 
 
पालघर परिसरातील सूर्या नदी आणि वैतरणा नदीच्या पूरात दोन जण वाहून गेले आहे. पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक अनेक गावांचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.