शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , सोमवार, 28 जुलै 2014 (10:39 IST)

मुंबईत हाय अलर्ट; पोलिस आयुक्तांना धमकी

इस्रायलकडून गाझापट्टीवर होणार्‍या हल्ल्यांचा बदला मुंबईत घेतला जाईल, अशा धमकीचे पत्र मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांना मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्‍यात आले आहे. 1993 मध्ये  तुम्ही मुंबईला वाचवले, आता मात्र, मुंबईची खैर नाही, असे आव्हान पत्रात दिली आहे. संबंधित पत्र मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने पाठवल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या 25 जुलैला पोलिस नियंत्रण कक्षास हे पत्र मिळाले आहे.  मुंबईतील 1993 मधील बॉम्बस्फोटांचा तपास मारियांनी केला होता. त्यामुळे हे पत्र त्यांना उद्देशून लिहिले असावे, असा अंदाज पोलिसांनी काढला आहे.