शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोलापूर , शनिवार, 26 मार्च 2016 (09:49 IST)

मुख्यमंत्री फडणवीस, गडकरी आज सोलापुरात

राष्ट्रीय महामार्ग विभागाचवतीने उभारणत येणार्‍या शहरातील दोन उड्डाण पुलासह सोलापूर-विजापूर, सोलापूर-कोल्हापूर आणि सोलापूर-गाणगापूर या चार पदरी रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन आज (शनिवार) दुपारी 2 वाजता जुळे सोलापुरातील अंबर हॉटेलसमोरील मैदानावर होत असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्क्ष रावसाहेब दानवे हे सोलापुरात येत आहेत. ही कामे पूर्णत्वास आल्यानंतर सोलापूरचा चेहरामोहरा बदलणार असून यामुळे सोलापूरच्या विकासाला गती मिळणार आहे. 
 
सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते सात रस्ता व पुढे विजापूर रस्तवरील पत्रकार भवन या मार्गावर सहा किलोमीटरचा उड्डाण पूल तसेच बोरामणी नाका ते कुमठा नाका ते पत्रकार भवन असा साडेसहा किलोमीटरचा उड्डाण पूल उभारणत येणार आहे. याशिवाय सोलापूर ते विजापूर (110 किलोमीटर), सोलापूर ते सांगली ते कोल्हापूर (225 किलोमीटर), सोलापूर ते अक्कलकोट ते गाणगापूर (110 किलोमीटर) असे चौपदरी रस्ते व काही ठिकाणी दुपदरी रस्ते करण्यात  येणार आहेत तर टेंभुर्णी येथे अंतर्गत काँक्रिट रस्ता व पादचारी भुारी मार्गही करण्यात येणार आहे. सुमारे 25 हजार कोटींचे चार पदरी रस्ते, दोन उड्डाण पुलासह अन् कामे सोलापुरात सुरू होत असून या सर्व कामांच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीयमंत्री गडकरी, बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापुरात येत आहेत. 
 
विधानसभा निवडणुकीपूर्वी 16 ऑगस्ट 2014 रोजी होम मैदानावर सोलापूर-पुणे या चार पदरी रस्त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात  आले होते. त्यावेळी झालेल्या सभेत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर ते गुलबर्गा मार्ग चार पदरी करण्याची घोषणा केली होती. आता दीड वर्षानंतर या सोलापूर ते गुलबर्गाऐवजी सोलापूर ते गाणगापूर या कामाचे भूमिपूजन होत आहे. रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी व दळणवळण सुधारणसाठी केंद्र सरकारने सर्व शहरे चार पदरी रस्तने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोलापूर शहर हे आता पुणे, हैदराबादनंतर विजापूर, सांगली, कोल्हापूर, अक्कलकोट, गाणगापूर या शहरांना चारपदरीने जोडले जाणार आहे.