शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 24 नोव्हेंबर 2014 (10:45 IST)

मुरली देवरा यांचे निधन

काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळख असणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि  माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव काँग्रेस कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी चार वाजता  चंदनवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पत्नी व दोन मुले असा त्यांचा मागे परिवार आहे. दरम्यान, ही वार्ता ऐकून आपण दु:खी झालो आहोत, अशा शब्दात पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.