शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पंढरपूर , शुक्रवार, 24 जून 2016 (11:36 IST)

यंदाची पंढरपूर वारी ‘निर्मल’

आषाढी वारीत पंढरपूरात वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरलेली असते.

त्यामुळे यंदाची वारी ‘निर्मल’ करणार असल्याचा निर्धार विभागीय आयुक्त चोक्कलिंग यांनी व्यक्त केला. आषाढी वारीच्या नियोजनाची बैठक आणि कामाची पाहणी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषेदत  बोलताना त्यांनी हा निर्धार व्यक्त केला.

यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मुक्कामी ५०० तर, जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी मुक्कामी ३०० प्री-फाब्रीकेटेड शौचालय उभे करणार असून २ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.