1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: औरंगाबाद , शनिवार, 18 एप्रिल 2015 (13:02 IST)

राणेंची ओवेसींना 5 कोटींची ऑफर

एमआयएम हा शिवसेनेचा नंबर एकचा शत्रू आहे. देशाच्या मुळावर उठलेल्या या पक्षाशी आम्ही साटेलोटे करण्याचा प्रश्नच येत नाही. उलट, वांद्रे पोटनिवडणूक न लढवण्यासाठी नारायण राणेंनीच ओवेसी बंधूंना पाच कोटी रुपयांची ऑफर दिली होती, पण हे सेटिंग फिस्कटल्याने ते आमच्यावर आरोप करताहेत, असा प्रतिहल्ला शिवसेना नेते आणि औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी आज चढवला.
 
वांद्रे पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना नेते आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. शिवसेना नेते राणेंवर कडवी टीका करत आहेत, त्यांना खोचक सल्ले देत आहेत, टोमणे मारताहेत. पराभव झाल्याने राणेंची बाजू तशी दुबळी आहे, पण तरीही त्यांचे समर्थक सारवासारव करायचा प्रयत्न करताहेत. अशातच, आपल्या वडिलांच्या बचावासाठी धाकटे चिरंजीव, अर्थात नीतेश राणे धावून आले. एका वृत्त पान 5 वर 
 
वाहिनीवरील मुलाखतीत त्यांनी राणेंवरील टीकेला, आरोपांना प्रत्युत्तरे दिली. राणेंनी एमआयएमला कुठलीही ऑफर दिली नव्हती, एमआयएम हे तर शिवसेनेचे पिल्लू असल्याचा प्रत्यारोप त्यांनी केला होता. कदम एमआयएमच्या आमदारासोबत जेवल्याचेही त्यांनी नमूद केले होते. त्यामुळे कदमांच्या भूमिकेविषयी संशय निर्माण झाला होता. औरंगाबादचा पालकमंत्री म्हणून तिथले अनेक नेते वेगवेगळी कामे घेऊन मला भेटायला येतात. देशाच्या मुळावर उठलेल्यांसोबत साटेलोटे करण्याचा प्रश्नच येत नाही, असे कदम यांनी निक्षून सांगितले. राणेंच्या मुलांना गल्लीतही कुणी किंमत देत नाही, त्यामुळे त्यांना गांभीर्याने घ्यायची गरज नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला. राणेंनीच ताज हॉटेलमध्ये ओवेसींची भेट घेऊन दोन भावांना पाच-पाच कोटी आणि पक्षासाठी वेगळा निधी देण्याची ऑफर दिली होती, पण त्यांची बोलणी फिस्कटल्याची माहिती आपल्याकडे असल्याचा दावाही कदम यांनी केला आहे.