शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2015 (12:14 IST)

रेल्वे अर्थसंकल्पावर शिवसेनेची जाहीर नाराजी

रेल्वे अर्थसंकल्पातही महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. याबाबत सेनेने दिलेल्या निवेदनाकडे भाजपा सरकारने दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
 
महाराष्ट्रात नवे रेल्वेमार्ग, मुंबईत लोकलची संख्या वाढवावी अशी मागणी शिवसेनेने केली होती. तसे निवेदन शिवसेनेच्या खासदारांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दिले होते. पण, यातील कोणत्याच मागणीकडे प्रभूंनी लक्ष न दिल्याने शिवसेनेने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
 
मंत्रीपदावरुन शिवसेना व सुरेश प्रभू यांचे संबंध बिघडले होते. आता प्रभू यांनी सेनेच्या मागणीकडे दुर्लक्ष करुन नाराजी ओढावून घेतली आहे. त्यामुळेच त्यांच्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पावर शिवसेनेने तोंडसूख घेतल्याचे बोलले जात आहे.