शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

वडापावसाठी शिवसैनिकाची दुकानदाराला मारहाण

मुंबई- ठाण्यात शिवसेना पदाधिकार्‍याने एका महिला पोलिसाला बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता मुंबईत आणखी एका शिवसैनिकाची गुंडागिरी उघडकीस आली आहे.
 
मुंबईच्या विलेपार्ले पश्चिम येथील युवासेनेचा शाखाअधिका-याने १०० वडापावसाठी तृप्ती फरसाण मार्टचे व्यवस्थापकाला लाकडी बाबूंने बेदम मारहाण केल्याचे दृश्य सीसीटिव्हीत कैद झाले आहेत.
 
सुनिल महाडिक असे या शाखाअधिकार्‍याचे नाव आहे तर तृप्ती फरसाण मार्टचे व्यवस्थापक केतन पाटील हे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयता उपचार सुरू आहेत.
 
विलेपार्ले पश्चिमच्या मैदानात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने साहेब क्रिकेट चषकाचे सामने भरवण्यात आले होते. या क्रिकेट सामन्यासाठी तृप्ती फरसाण मार्टच्या मालकांनी १०० वडापाव मोफत दिले नाहीत म्हणून व्यवस्थापकाला जबर मारहाण करण्यात आली.
 
सुनिल महाडीकविरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.