शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

वारकर्‍यांनाही विम्याचं संरक्षण

पंढरपूर- विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणार्‍या भाविकांना आता विम्याचे संरक्षण मिळणार आहे. येत्या काही दिवसात भाविकांना ही सुविधा लागू होणार आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी याबाबत माहिती दिली. 
 
मुंबईमधील प्रसिद्ध लालबागचा राजा या गणेश मंडळाकडून दर्शनासाठी येणार्‍या भाविकांचा विमा उतरवण्यात येतो. याच धर्तीवर पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना देखील आता विम्याचे संरक्षण मिळणार आहे. वारीदरम्यान अनेकदा अपघातासारख्या अनुचित घटना घडता किंवा पंढरपुरातही अशा दुर्घटना घडतात, याचा विचार करुन वारकर्‍यांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.