शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 सप्टेंबर 2016 (11:19 IST)

विलास शिंदे यांना शहीद दर्जा: मुख्यमंत्री

मुंबई-  मारहाणीत मृत्यू झालेले वाहतूक पोलीस कर्मचारी विलास शिंदे यांना शहीद दर्जा देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जाहीर केले. दरम्यान, पोलीस कॉलनीत शिंदे यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांना महिलांनी घेराव घातला. 
 
शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री गेले होते. त्यांच्या मुलाला सरकारी नोकरीत समावेश करता यावा, यासाठी प्रयत्न देखील करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. यातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
कर्तव्य बजावत असताना शिंदे यांचा मृत्यू झाल्याने त्यांना शहीद दर्जा देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.