शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

विश्वमंगल गो-ग्राम यात्रा 16 ला जळगावात!

गोहत्या बंदी, गो संवर्धनासाठी स्वाक्षरी मोहीम

PR
PR
देशभर गायींचे महत्त्व सांगून गो-साक्षरता निर्माण करण्‍याच्या उद्देशाने सुरू करण्‍यात आलेल्या विश्वमंगल गो-ग्राम यात्रा येत्या 16 डिसेंबर रोजी खान्देशातील जळगाव येथे येणार असून या निमित्ताने येथील खान्देश सेंट्रल, खान्देश शॉपिंग कॉम्पलेक्स परिसरात भारत माता व गो-माता महाआरती उत्सवाचे आयोजन करण्‍यात आले आहे, असे जिल्हा समितीचे अध्यक्ष गो- पालक अजय ललवानी यांनी कळवले आहे.

गाय ही विश्वाची माता असून प्राचिन भारतीय समाजरचनेचा व परंपरेचा केंद्रबिंदू आहे. मात्र गोहत्येचे प्रमाण वाढले असून देशी गाय जवळजवळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. गायींच्या शेकडो प्रजातींपैकी आज केवळ 33 प्रजाती उरल्या आहेत. येणार्‍या काळात गायींचे संरक्षण झाले नाही तर निसर्गाने दिलेली ही अनमोल भेट अस्तित्वात राहणार नाही, यासंदर्भात समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे. गोमातेच्या पुनरुज्जीवनासाठी विश्वमंगल गो- ग्राम यात्रा आयोज‍ित केली आहे.

विश्वमंगल गो-ग्राम यात्रा येत्या 16 डिसेंबर रोजी जळगावी दाखल होणार असून देशाती‍ल संत-महंत, मान्यवर व गोमक्तांच्या उपस्थितीत संध्याकाळी साडे पाचला भारतमाता व गोमाता महाआरतीचा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी प.पू. श्रीमद्‍ जगद्‍गुरू शंकराचार्य विद्यानृसिंह भारतीजी (करवीर पीठ) हे उपस्थित राहणार आहे.

विजयादशमीला महाभारतकालीन संग्रामस्थळ कुरुक्षेत्र येथून या यात्रेला प्रारंभ झाला असून सुमारे 20 हजार ‍किमी व 108 दिवसांचा प्रवास करून विश्वमंगल गो-ग्राम यात्रा मकरसंक्रांतीला नागपूर येथे संपन्न होणार आहे.

गोहत्या बंदीसाठी विशेष स्वाक्षरी मोहीम-
विश्वमंगल गो-ग्राम यात्रेच्या माध्यातून गोहत्या बंदी, कृत्रीम रेतन पध्दतीवर बंदी, गो संवर्धन, गो- मातेसाठी स्वतंत्र मंत्रालय, अशा विविध मागण्यांच्या पत्रावर लोकसहभातून स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. स्वाक्षरींचे निवेदन महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचेकडे देण्यात येणार आहे.