शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 26 नोव्हेंबर 2014 (11:55 IST)

वीज ब‍िल वसुली स्थगित;दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांन दिलासा देण्यासाठी वीज बिलांच्या वसुलीस राज्या सरकारने  स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच बारावीपर्यंत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची फी  माफ करण्‍यात आल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. 
 
राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात दुष्काळ पडला असून या परिसराची खडसे यांनी आठवडाभर पाहाणी  केली. विदर्भ आणि मराठवाड्यात दुष्काळ परिस्थिती पाहुन तेथील शेतकर्‍यांना मदत करण्याची  सरकारची भूमिका आहे. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागांसाठी  शेतकर्‍यांना हेक्टरी 35 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्रही मदत दोन  हेक्टरपर्यंत असेल. तसेच दुष्काळ भागात विकास कार्यक्रमही राबविले जाणार आहेत. लोकांना  रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
    
दरम्यान, वीज बिलाबाबतच्या माझ्या वक्तव्याचा मीडियाने विपर्यास केल्याची सारवासारव महसूलमंत्री  एकनाथ खडसे यांनी केली आहे. मोबाईलचे बिल भरता मग वीजबिल का भरत नाहीत, या  वक्तव्यावरुन चहूबाजूंनी जोरदार टीका झाली होती. त्यावर खडसेंनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत  स्पष्टीकरण दिले.
 
शेतकऱ्यांनी मोबाईल बिलाचे पैसे वाचवून ते वीजेसाठी वापरावे, असा माझ्या वक्तव्याचा अर्थ होता,  असेही खडसे यांनी नमूद केले . मात्र ज्यांना भूईमुग जमिनीखाली उगवतो की जमिनीवर हे माहित  नाही, त्यांनी यावर प्रतिक्रिया देणे चुकीचे असल्याचे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.