शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (14:45 IST)

शिवसेना दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार

विधिमंडळात विरोधी बाकांवर बसलेल्या शिवसेनेने आता दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. दिल्लीत सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा शिवसेनेचा विचार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका मराठी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले आहे. दरम्यान, शिवसेना आणि भाजपमधील दरी आणखी रुंदावताना दिसत आहे.
 
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेची 25 वर्ष जुनी मैत्री तुटली होती. शिवसेना आणि भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली होती.
 
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने नेत्यांची चाचपणी सुरु केली आहे. यापूर्वी शिवसेनेने गुजरात विधानसभा निवडणुकीत उतरण्यावरून भाजपमधून नाराजी व्यक्त झाली होती.
 
शिवसेनेने यापूर्वीदेखील राज्याबाहेर निवडणूक लढवली होती. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याची शिवसेनेने तयारी केली आहे.