शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: बेळगाव , शुक्रवार, 1 ऑगस्ट 2014 (16:31 IST)

शिवसेना नेते रावतेंची पत्रकार परिषद उधळली

बेळगावात शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्नाटक पोलिसांनी पत्रकार परिषद उधळून लावल्याची माहिती मिळाली आहे. कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिकांवर अमानुष लाठीमार करत घरात घुसून मारहाण केली. या मराठी भाषिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी रावते बेळगावात गेले होते.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावमधील मराठी भाषिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ आज (शुक्रवार) बेळगावात पोहोचले. या शिष्टमंडळाचे आमदार दिवाकर रावते यांनी नेतृत्व केले आहे. मात्र शिवसेना शिष्टमंडळाला बेळगावात पोलिसांनी विरोध केला. पोलिसांनी शिवसेना शिष्टमंडळाला येळ्ळूरमध्ये प्रवेश बंदी केल्याचेही समजते.