शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 22 ऑक्टोबर 2014 (11:51 IST)

शिवसेनेशिवाय सरकार, पण दिवाळीनंतरच?

‘राज्यातील नवे सरकार स्थापन करण्यासाठी आता दिवाळी सण होईपर्यंत थांबा’ अशी स्पष्ट भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतली आहे. 
 
पक्षाचे राज्याच्या निवडणुकीचे केंद्रीय निरीक्षक असणारे ओम माथूर यांनी सप्ष्ट केले की सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडे पुरेसे संख्याबळ आहे आणि ती प्रक्रिया दिवाळीनंतरच सुरू केली जाईल. भाजपने येथील नेतृत्व निवडीसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यावर जबाबदारी दिली आहे. ते दिवाळीनंतर सरचिटणीस नड्डा यांच्यासह मुंबईत दाखल होतील. तोवर सार्‍या आमदारांनीही दिवाळीसाठी आपापल्या गावी घरी परतावे असे पक्षातफर्फे सांगण्यात आले आहे. ओम माथूर यांनी असेही स्पष्ट केले की राष्ट्रवादीने आम्हाला बाहेरून व बिनशर्त पाठिंबा देऊ केला आहे पण तो घ्यायचा की नाही हे आमच्या पक्षाचे केंद्रीय संसदीय मंडळच ठरवेल.
 
राष्ट्रवादीच्या शिवायही सरकार बनू शकते. कुणाच्याही आतून वा बाहेरून असणार्‍या पाठिंब्यावर सरकार बनू शकते अशा शब्दात त्यांनी शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय सरकार होऊ शकते असेच सूचित केले आहे. अपक्ष तसेच छोटय़ा पक्षांनी सरकारला पाठिंबा देऊ केला आहे. तो घेऊन दिवाळीनंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी करून घेण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई यांनी सांगितले आहे की आम्ही भाजपकडे कोणताही प्रस्ताव दिलेला नाही.
 
सूत्रांच्या माहितीनुसार नागपूरचे तरुण आमदार व प्रांताध्यक्ष देवेंद्र ङ्खडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली भाजपचे महाराष्ट्रातील पहिले सरकार स्थापन केले जाईल. दिवाळीनंतर ङ्खडणवीस यांची रीतसर निवड पक्षाच्या विधिमंडळ नेता म्हणून केली जाईल. दिल्लीत झालेल्या पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
 
दरम्यान, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी नव्या मुख्यमंर्त्यांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा सुरू केली आहे. पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून नितीन गडकरींनी यावे असे माझे आवाहन आहे. ते आले तर उत्तम कामगिरी पार पाडतील. मुनगंटीवार म्हणाले की, भाजपच्या सत्तेसाठी शिवसेनेने पाठिंबा द्यावा हे योग्य होईल. त्यांच्याबरोबरही आम्ही दिवाळीनंतर चर्चा करणार आहोत. मात्र, त्यांच्यासमवेत सत्ता वाटपाचे सूत्र काय (पान पाच पाहा) असावे यावर कोणतेही भाष्य करण्यास मुनगंटीवार यांनी नकार दिली. ते म्हणाले की, अशी चर्चा समोरासमोरच केली जाते, माध्यमांतून करता येत नाही. आम्ही योग्यवेळी योग्य सत्रावर चर्चा करू. इकडे रिपब्लिकन पार्टी ऑङ्ख इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी सांगितले की, भाजपने शिवसेनेच्या पाठिंब्याने सरकार करणे इष्ट असून आम्ही या संदर्भात भाजप नेत्यांशी चर्चा करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसने देऊ केलेला पाठिंबा स्वीकारणे हे जनतेला मान्य होणार नाही. जरी विरोधात निवडणूक लढले असले तरी शिवसेना व भाजपने मिळून 186 जागी विजय मिळवलेला आहे हे लक्षात घेता आता या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन राज्य केले पाहिजे असाच जनादेश आहे. भारतीय जनता पक्षाने कोणाचीही निवड मुख्यमंत्रिपदासाठी केली तरी आम्ही त्याला पूर्ण सहकार्य करू असे सांगून आठवले म्हणाले की निवडणुकीआधी आम्ही दोन्ही पक्षांनी जी चर्चा केली होती व जी आम्हाला भाजपने लेखी दिली आहे त्यात असे मान्य करण्यात आले आहे की केंद्रात विस्तार होईल तेव्हा आम्हाला मंत्रिपद देण्यात येणार आहे. त्याशिवाय राज्य सरकारमध्ये दोन केंद्रीय व दोन राज्य मंत्रिपदे आम्हाला देण्याचे मान्य करण्यात आले होते. आता भाजपचे एकटय़ाचे सरकार येणार नसून त्यांना शिवसेनेची मदत लागणार आहे. त्यामुळे आम्हाला मान्य केलेली सारी मंत्रिपदे जरी मिळाली नाहीत तरी निदान एक कॅबिनेट आणि एक राज्य मंत्रिपद देण्यात यावे. शिवाय दहा महामंडळांची अध्यक्षपदे आणि तीस मंडळ सदस्यपदे आरपीआयला मिळाली पाहिजेत असेही आठवले म्हणाले.
 
डांगळेंना परत घेण्याचा प्रश्नच नाही : आठवले
 
शिवसेनेबरोबर युती करायची की भाजपबरोबर जायचे या मुद्दय़ावर आरपीआयचे ज्येष्ठ नेते अजरुन डांगळे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या अखेरच्या टप्प्यात रामदास आठवलेंपासून फारकत घेतली होती. आता तुम्ही शिवसेनेबरोबर सरकार करावे असे भाजपला सांगत आहात तर तिकडे गेलेल्या डांगळे यांनाही परत बोलावणार का असा सवाल आठवलेंना करण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, अजरुन डांगळे हे जरी आमचे मित्रच असले तरी ते पक्ष सोडून गेले आहेत आता त्यांना परत घेण्याचा प्रश्नच नाही. त्यांना काय हवे आहे ते त्यांनी तिथूनच, शिवसेनेतूनच घ्यावे असाही सल्ला आठवलेंनी दिला.