शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 जून 2016 (09:44 IST)

साध्वी प्रज्ञाचा जामीन एनआए कोर्टाने फेटाळला

मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा हिच्याविरोधात ठोस पुरावा नसल्याचे सांगून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) क्लीन चिट दिलेल्या साध्वी प्रज्ञा सिंहचा जामीन अर्ज एनआयएच्या विशेष न्यायालयाने फेटाळून लावला. जामिनासाठी साध्वी प्रज्ञा सिंहला हायकोर्टात दाद मागावी लागणार आहे.
 
2008 साली मालेगावात झालेल्या बॉम्बस्ङ्खोटत साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिला संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली. साध्वी प्रज्ञाविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचा निर्वाळा देत राष्ट्रीय तपास संस्थेने पुरवणी आरोपपत्रात साध्वीला क्लीन चिट दिली होती. एनआयकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर साध्वी प्रज्ञाने एनआयएच्या विशेष कोर्टाकडे जामिनासाठी अर्ज केला होता.