शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|
Last Modified: पुणे , बुधवार, 26 नोव्हेंबर 2008 (08:51 IST)

साहित्य संमेलन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

महाबळेश्वर येथे होणा-या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. साहित्‍य महामंडळातर्फे या निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर करण्‍यात आला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 1 डिसेंबरपर्यंत असणार आहे. तर अर्ज माघारीची अंतिम तारीख 5 डिसेंबर आहे. निवडणुकीची मतमोजणी आणि निकाल 16 जानेवारीला जाहीर केला जाईल.