शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , मंगळवार, 19 ऑगस्ट 2014 (17:17 IST)

हिंदुस्थान हिंदूंचे: मोहन भागवतांचे वक्तव्य योग्यच- उद्धव ठाकरे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू राष्ट्रासंदर्भात केलेल्या वक्तव्याला आपण सहमत असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 
 
हिंदुस्थान हे हिंदूंचे राष्ट्र असून हिंदू धर्मात सर्व जाती-धर्मांना पचवण्याची ताकद असल्याचे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले होते. भागवत यांच्या वक्तव्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. 
 
यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपण संघाच्या भूमिकेशी सहमत आहोत. हिंदुस्थान हे हिंदूंचेच राष्ट्र आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही हेच विचार होते, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.