शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2016 (09:37 IST)

‘आपले सरकार’ पोर्टल सुरू

मुंबई- राज्यात 15 ऑगस्टपर्यंत सर्व 250 नागरी सेवा ऑनलाइन उपलब्ध होतील, असे मुख्मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. नासकॉम इंडिया फोरमच वार्षिक परिषदेत उद्घाटनप्रसंगी फडणवीस बोलत होते.
 
नागरिकांना सेवा पुरविणसाठी ‘आपले सरकार’ हे पोर्टल सुरू करण्यात आले असून सध्या 150 सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. सर्व नागरिकांना पारदर्शक पध्दतीने सेवा पुरविण्याचा उद्देश्य असल्याचे मुख्मंत्र्यांनी स्पष्ट केले. जनतेसाठी ‘सेवेचा अधिकार’ या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी आपले प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.