शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

‘लोकमान्य टिळक’ पुरस्कार शरद पवार यांना जाहीर

पुणे- लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून सोमवार, 1 ऑगस्ट रोजी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी सहा वाजता होणार्‍या कार्यक्रमात पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे
 
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतङ्र्खे कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना यंदाचा लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून सोमवार, 1 ऑगस्ट रोजी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी सहा वाजता होणार्‍या कार्यक्रमात पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महापौर प्रशांत जगताप, ट्रस्टचे विश्वस्त आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि उपमहापौर मुकारी अलगुडे या वेळी उपस्थित राहणार आहेत. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच’ या लोकमान्यांनी केलेल्या सिंहगर्जनेचे शताब्दी वर्षाचे औचित्य या कार्यक्रमाला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी सोमवारी दिली. या कार्यक्रमात टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे काढण्यात आलेल्या डॉ. दिलीप साठे यांच्या ‘मंडालेतील गीतारहस्य’ या पुस्तकाचे, कल्पना खरे संपादित ‘युगपुरुषाची स्मृतिपुष्पे’ या पुस्तकाचे आणि ‘केसरी’च्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ या विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे.