शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Updated : गुरूवार, 27 ऑक्टोबर 2022 (08:19 IST)

सर्वोत्कृष्ट सासू बनण्यासाठी फक्त या टिप्स फॉलो करा

लग्नानंतर प्रत्येक मुलीची इच्छा असते की नवीन घरात गेल्यानंतर त्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी तिचे स्वागत प्रेमाने करावे आणि तिला आपल्या कुटूंबात समाविष्ट करावे. नवीन घरात नवे लोकांशी सामंजस्य करण्यासाठी प्रत्येकाला मेहनत घ्यावी लागते. त्यातील एक नातं आहे सासू आणि सुनेचे किंवा सासू आणि जावयाचे. एक चांगली सासू बनण्यासाठी या टिप्स अवलंबवा.
 
1 एकसमान व्यवहार करा- जर आपण आपल्या मुला किंवा मुली साठी काही भेटवस्तू आणाल तर सुने साठी आणि जावयासाठी देखील काही भेटवस्तू आणा. असं केल्याने त्यांना चांगले वाटेल. 
 
2 पक्ष घेऊ नका- प्रत्येक जोडप्यात वाद आणि भांडण होतातच. गरज नसल्यास मुलगा- सून, मुलगी-जावई यांचा भांडण्यात डोकावू नका. आणि जर गरज असल्यास कोणा एकाचा पक्ष घेऊ नका. अशा परिस्थितीत आपली भूमिका तटस्थ ठेवा. 
 
3 ढवळाढवळ करू नका-  सासू म्हणून आपल्या सुनेची काळजी घेणं चांगली गोष्ट आहे. सून नोकरदार असल्यास तिचा ऑफिसच्या कामा बद्दल विचारपूस करणे चांगले आहे. पण तिच्या प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करणे चांगले नाही. असं केल्याने आपण तिच्यावर पारख ठेवल्याचे जाणवू शकते. 
 
4 निंदा नालस्ती करू नका- बऱ्याच वेळा काही बायका आपल्या सुने किंवा जावया बद्दल आपल्या मित्रा,मध्ये आणि नातेवाईकांमध्ये निंदा करतात असं केल्याने आपलं नातं कमकुवत होऊ शकतं.आपण त्यांची निंदा नालस्ती करता हे त्यांना कळल्यावर त्यांना वाईट वाटू शकते आणि नात्यात दुरावा येऊ शकतो.
 
5 त्यांचा खास गोष्टी लक्षात ठेवा- आपली सून आणि जावयाशी निगडित काही खास तारखा आणि दिवस लक्षात ठेवा. त्यांना त्या खास दिवशी शुभेच्छा आणि भेटवस्तू द्या.असं केल्याने आपण आपल्या नात्याला सुंदर आणि घट्ट करू शकता. असं केल्याने आपण चांगली सासू म्हणून नेहमी साठी प्रसिद्ध व्हाल.