रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. तीर्थ-क्षेत्र
Written By
Last Updated : शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (08:50 IST)

व्यादेश्वर महादेव मंदिर रत्नागिरी

Vyadeshwar Guhagar
श्री व्यादेश्वर हे एक प्राचीन मंदिर आहे. तसेच भक्तांकरिता पूजनीय आहे. हे मंदिर भगवान महादेवांना समर्पित आहे. असे मानले जाते की, भगवान शिव व्यादेश्वर रूपामध्ये गुहागर मध्ये राहतात. हे 70 फूट लांब आणि 80 फूट उंच व्याडेश्वर मंदिर खडकाने बनलेले आहे. मंदिर पंचायतन शैली मध्ये बनलेले आहे. ज्याच्या चारही दिशांना चार सहायक मंदिर आहे. हे मुख्य मंदिर या चबुतऱ्याच्या मध्ये स्थित आहे. भगवान शंकरांच्या चारही बाजूंनी भगवान गणेश, देवी पार्वती, भगवान विष्णु और देवी लक्ष्मी आणि सूर्य आहे. मुख्य मंदिरासमोर नंदीची एक सुंदर मूर्ती स्थापित आहे. सर्व मुर्त्या संगमरमर पासून बनलेल्या आहे. व्याडेश्वर मंदिरला तीन प्रवेशव्दार आहे. पूर्व, पश्चिम आणि दक्षिण कोपरा.
 
मंदिराचा इतिहास आणि आख्यायिका-
व्याडेश्वर मंदिराचे पूर्व दिशाकडे मुख आहे. मंदिरामध्ये प्रवेश करतांना मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला हनुमान मंदिर आणि गरुड मंदिर पाहवयास मिळते. मंदिरामध्ये महिरापी, भगवान गणेश आणि देवी लक्ष्मी यांचे चित्र प्रदर्शित आहे. 
 
एका पौराणिक कथा अनुसार परशुराम यांनी कोंकण भूमि निर्माण केली होती. त्यांनी देवी-देवतांना  कोकणात वास्तव्य करणे आणि विभिन्न कुळांची जवाबदारी सांभाळण्यासाठी विनंती केली होती. भगवान शंकरांचे भक्त असल्या कारणाने परशुराम यांनी भगवान शंकरांना प्रत्येक दिवशी दर्शन देण्याची प्रार्थना केली. भगवान शिव यांनी प्रार्थना स्वीकार केली. भगवान परशुरामांनी 60 विप्रांची व्यवस्था केली. 'व्याद' नावाचा विप्रने गुहागर मध्ये एक शिवलिंग स्थापित केले. त्यावेळी, वाईट विचारांची वृत्ती बळावली होती, याकरिता देवांना अदृश्य रूपामध्ये राहावे लागत होते. याकरिता, भगवान शिव यांनी  व्याद मुनि व्दारा स्थापित शिवलिंग मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. म्हणून या शिवलिंगाला व्यादेश्वर महादेव नावाने ओळखले जाते.
 
सण आणि उत्सव-
गुडी पडावा, गणेश चतुर्थी, शिमगा, महाशिवरात्री, हनुमान जयंती आणि विजयदशमी इत्यादी मोठे सण, उत्सव मोठ्या जलौषात साजरे करण्यात येतात.
 
श्रावण आणि कार्तिक महिन्यामध्ये संपूर्ण क्षेत्र तीर्थक्षेत्रात बदलते. शिवलिंग वर दही-भाताचा नैवेद्य लावण्यात येतो. आषाढी आणि कार्तिक एकादशीच्या दिवशी भगवान व्याडेश्वर यांचा मुखवटा भक्तांना दर्शन देण्यासाठी सभामंडपात ठेवण्यात येतो. व्याडेश्वर मंदिर मध्ये एक अजून मुख्य सण साजरा करतात ती म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा आहे. जी कार्तिक महिन्यामध्ये येते. सकाळी पूजा, रुद्राभिषेक आणि हवन केले जाते. संध्याकाळी कीर्तन आणि तुलसी विवाह केला जातो.
 
कसे जावे व्यादेश्वर महादेव मंदिर 
रस्ता मार्ग- : गुहागर, चिपळूण पासून 45 किमी दूर आहे व्यादेश्वर महादेव मंदि. तसेच या मार्गावर अनेक वाहन उपलब्ध आहे.
 
वायुमार्ग: जवळच गोवा विमानतळ आणि कोल्हापुर विमानतळ जे फक्त 148 किमी दूर आहे. विमान तळावरून टॅक्सी सेवा उपलब्ध होऊ शकते.
 
रेल्वे मार्ग:  चिपळूण रेल्वे स्टेशन पासून 35 किमी आहे व्यादेश्वर महादेव मंदिर.