सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. प्रजासत्ताक दिन
Written By
Last Modified: सोमवार, 20 जानेवारी 2020 (13:22 IST)

Republic Day: आपले कर्तव्य जाणून घ्या

जानेवारी महिन्यापासून सणवारांची रैलपैल सुरू होते. या महिन्यात 2 मोठे सण येतात मकर संक्रांती आणि प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन हा सण ......? होय, प्रजासत्ताक दिन हा पण एक मोठा सणच आहे. कसे काय या मग जाणून घेऊ या......
 
हे तर सर्वांना विदित आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. आपण इंग्रेजांच्या तावडीतून मुक्त झालो होतो पण आपण फक्त नावासाठी स्वतंत्र झालो होतो. आपल्याला काहीही करण्याची स्वतंत्र नव्हती. इंग्रजांच्या नियमावलीच्या चौकटीत आपण वावरत होतो. स्वतंत्रपणे काही करण्याची मुभा नव्हती. खऱ्या अर्थाने आपल्याला 26 जानेवारी 1950  रोजी डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांनी आपल्या स्वतंत्र भारत देशासाठी काही नियमावली निर्मित केली. त्या नियमानुसारच देशाचा कार्यभार चालेल असे ठरले आणि भारतासाठी नवा संविधान बनला. आणि हा संविधान 26 जानेवारी रोजी पारित केला गेला. हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून म्हटला जातो. 
 
प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. या नियमावलीनुसार प्रत्येक माणसाला स्वच्छंदपणे राहण्याची, बोलण्याची, विचार करण्याची स्वतंत्रता आहे. जरी स्वतंत्रता असली तरी एका चौकटीत राहूनच प्रत्येकाने वागावे. 
 
प्रजासत्ताक दिनी बहुधा काही लोक सुट्टी मिळाली म्हणून आनंदाने घालवतात किंवा कुठे बाहेर सहलीला जाऊन दिवस घालवतात. खरे तर आजच्या पिढीला प्रजासत्ताक म्हणजे काय हेच माहीत नाही. ह्यात त्यांचा दोषच नाही. कारण आपण त्यांना ह्याची व्यवस्थित माहितीच देत नाही. तरुण वर्गाला प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिन मधील अंतरच माहीत नाही. त्यांना त्याबद्दल सांगावे आणि आपल्या कर्तव्याचे पालन करण्यास प्रवूत्त करावे. स्वतंत्र देशाचे सुज्ञ नागरिक होण्याच्या नात्याने आपले पण काही कर्तव्य आहे. 
 
चला मग बघू या काय आहे हे कर्तव्य :-
 
1 भारताच्या संविधानाचे पालन केलेच पाहिजे.
2 आपल्या देशाच्या झेंडा आणि राष्ट्रगीत यांचे नेहमीच आदर केले पाहिजे. 
3 भारताच्या सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेचे रक्षण करावे आणि ते अबाधित ठेवावे.
4  देशाचे रक्षण करावे आणि वेळ पडेल तशी देशाची सेवा करा.
5 भारतातील सर्व लोकांमध्ये समानता आणि समान बंधुता निर्माण करण्याची भावना निर्माण करावी.
6 महिलांना सन्मान द्यावा.
7 आपल्या वेग वेगळ्या संस्कृतीचे महत्त्व समजून त्याचे जतन करावे.
8 सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करावे आणि हिंसाचारापासून दूर राहावे.
9 कायदा कधीही मोडू नये. कायद्याचे शिस्तीने पालन करावे.
10 पर्यावरणाला जपावे.
11 प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार मिळू द्यावा.
12 प्रत्येकाशी सलोख्याने वागावे.
13 वाहतूक नियमांचे शिस्तीने पालन करावे. 
 
हे सगळे कर्तव्यं आपलेच आहे. हे नीटपणे पार पाडायला हवे आणि आम्हीही या देशाचे सुज्ञ नागरिक आहोत हे सिद्ध करून दाखवायला हवे.